आगामी सण-उत्सव तसेच निवडणुका लक्षात घेता पोलिसांनी सराइत गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने प्रतापूर (ता. जत) येथील सराईत गुन्हेगार सद्दाम बालेखान सोनीकर (वय २७, रा. सोनीकर वस्ती, प्रतापूर) याला सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सद्दाम सोनीकर याचेवर चोरी, मारहाण, धमकी, दहशत निर्माण करणे, अशा स्वरूपाचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारावरील कठोर कारवाईसाठी जत