पाटोदा तालुक्यातील सौताडा घाट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. घाटातील मुख्य रस्त्याचा मोठा भाग अचानक खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सकाळपासूनच रस्ता खचल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी तासन्तास अडकून पडले, तर स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने यंत्रणा दाखल केली. पोकलेनच्या साहाय्याने रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करण्यात