साक्री तालुक्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा प्रवाह वाढत आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून आज गुरुवारी दि.४ सप्टेंबर रोजी सद्यस्थितीत ३००० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आलेले असून