गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील जामखारी येथे माजी सरपंच श्रीराम कटरे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जळून खाक झाली. ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.आगीत गोवर्धन कटरे, हेमंत कटरे व खिलेश्वर कटरे यांची घरे पूर्णतः जळून खाक झाली. यात अंथरूण, कपडे, अन्नधान्य, रोख रक्कम असे साहित्य भस्मसात झाले.