अंबाजोगाई शहरात आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेला एसटी बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. विजयमाला वाघमारे (वय अंदाजे 55) असे मृत महिला सेविकेचे नाव असून त्या गेल्या 35 वर्षांपासून अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. हा अपघात लातूर रोडवरील गोरेवाडी परिसरात घडला. धारूर-परळी अशी बस सेवा असलेल्या एसटीमधून उतरत असताना ही दुर्घटना घडली. महिला खाली उतरत असतानाच बस चालकाने गाडी पुढे घेतल्याने त्या थेट चाकाखाली चिरडल्या गेल्या.