बीडच्या वडवणी तालुक्यातील उपळी येथे कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाताना मुस्लिम बांधवांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे शेख इब्राहिम यांचा मृत्यू झाला होता मात्र नदीला पूर आल्याने दफनविधी करण्यासाठी सदरील मृतदेह नदीच्या कमरेत त्या पाण्यातून घेऊन जावा लागला मात्र नदीच्या प्रवाहात घेऊन जाणाराचाही जीव धोक्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती म्हणून आम्हाला या ठिकाणी पूल बनवून देण्यात यावा अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे पाण्यातून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे