शिवणी शिवारात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने चागंलाच धुमाकूळ घातला आहे.यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शुक्रवारी हा बिबट्या शिवणी शिवारातील शेतकरी किशोर दिघे यांच्या शेतातील बंड्यावर पोहचला व याठिकाणी असलेल्या कुत्र्यावर झडप टाकून कुत्र्याला जागीच गतप्राण केले. या परिसरात वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी जाऊन पाहणी केली. या बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने याठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहे.