जिल्ह्यातील पाथरी उपवन परिक्षेत्रात परिसरात धुमाकूळ घालून जीव घेणाऱ्या पट्टेदार मोठ्या वाघीण ला जेरबंद करण्यात पाथरी येथे आज दि 7 सप्टेंबर ला 5 वाजता येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला अखेर यश आले असून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी येथे एका शेतकऱ्याच्या मृत्यू झाला होता तसेच या परिसरात मोठया प्रमाणात दहशत माजविण्याचे काम या वाघीण ने केले असून अखेर वाघिणीला पकडण्यात यश आले.