लातूर : -ज्येष्ठा गौरी सण सुरु झाल्याने आज 1सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून लातूर येथील मुख्य मध्यवर्ती बसस्थानकासह बसस्थानक क्रमांक ३ आणि इतर बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे अनेक मार्ग अन् पूल पाण्याखाली गेले होते. दोन दिवसांपासून काही मार्गावरील वाहतूक बंद होती. मात्र, शनिवारी वाहतूक पूर्ववत झाली. तरी प्रवाशांची वाढती गर्दी, अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून आले.