घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील अंदाजे १५ हजार रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाल्याची घटना आज दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान गोपाळ नगर येथे उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, गोपाळ नगर भागातील रहिवासी मंदाबाई अर्जुन डाबेराव वय 58 वर्ष हे घरामध्ये स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्पोट झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत व पोलीस कॉन्स्टेबल देविदास चव्हाण तसेच नगरपरिषद अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल.