मृतक संजय मेश्राम वय 54 वर्ष राहणार सोनी तालुका गोरेगाव याला मधमाशी चावल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान उपचारासाठी केटीएस दवाखाना गोंदिया येथे आयसीयू वार्डमध्ये भरती करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा दिनांक 28 ऑगस्ट च्या सकाळी 3 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. प्राप्त मेमो वरून दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान गोरेगाव पोलिसात मर्ग नोंद करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.