अलिबाग-रोहा (पूर्वीची रामराज मार्गे) मार्गे जाणारी एस.टी. सेवा नवघर पूल धोकादायक असल्याने बंद करून कुर्डुस मार्गे वळवण्यात आली होती. ती आता 15 ऑगस्ट नंतर बंद करण्यात आली. परंतु ती एसटी तातडीने सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्ष राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.