लातूर : तालुक्यातील बाभळगाव येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी महादेव व्यंकटराव देशमुख तर उपाध्यक्षपदी धनराज शिवाजी मस्के यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली होती. या निवडीबद्दल माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा आज दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बाभळगाव येते सत्कार करण्यात आला.