उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. परंतु ते एकत्र आले तरीही यात आपला काही नुकसान होणार नाही. मुंबई महापालिका महायुतीच्या हाती येईल.पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र लढले आणि पडले.निवडणुकीत ते एकत्र येतील असे वाटत नाही आणि आले तरीही महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि महायुतीला त्याचा फायदा होईल,अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज 7 सप्टेंबर रोजी दुपारी बुलढाणा येथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.