जिल्ह्यातील माजरी - पाटाळा क्षेत्रातील अतिवृष्टी व बुरशीजन्य,करपा येल्लो मोझाक इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव शेतपिकावर वाढला असून काही परिसरात अतिवृष्टी मुळे पिके सडली आहेत, त्यामुळे बळीराजा हलबल झाला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे भविष्य उध्वस्त झाले आहे.आहे.यामुळे शासनाने त्वरित पावले उचलून प्रभावीत पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज दि 5 सप्टेंबर ला 12 वाजता पळसगाव येथील उपसरपंच स्वप्नील वासेकर यांनी शासनाकडे केली आहे.