गणेश उत्सव व ईद महोत्सवाच्या निमित्ताने आज दिनांक 27 ऑगस्टला दुपारी बारा वाजता रिद्धपूर येथे, शांतता कमिटी,प्रतिष्ठित नागरिक, मज्जिद मौलाना, व गणेश उत्सवाचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. ठाणेदार सचिन लुले या बैठकीला मार्गदर्शन करून, उत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना उपस्थितितांना देण्यात आल्या असून, ध्वनी प्रदूषण, आक्षेपार्ह पोस्ट, मिरवणुकीचे मार्ग, वेळ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले