शहरा नजीक पोस्टे पडोली येथे १० सप्टेंबर ला घरफोडीचा गुन्हा दाखल असून महाकाली नगरी ०२, देवाडा, पडोली येथे एका नवीन घराचे बांधकाम सुरू असून घराच्या पेंटींगसाठी लागणारे पेंटचे डब्बे व ईलेक्ट्रीक साहित्यांची कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती वरून दुर्गापुर येथे दोन आरोपींना मुद्देमालसह अटक केली असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.