वडवणी तालुक्यातील गट क्रमांक ६५६ हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. सकाळपासून महसूल विभागाच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू करण्यात आली असून, गायरान जागेवर बेकायदा उभारलेली बांधकामे तसेच शेती स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरु आहे. सरकारी गायरान जमिनीवर काही नागरिकांनी अनधिकृतपणे शेती केली होती, तर काहींनी तात्पुरती झोपडी व बांधकामे उभारून जमिनीवर ताबा मिळवला होता.