वाठार वारणानगर रोडवरील तळसंदे गावच्या हद्दीत रेणुका हॉटेलसमोर गुरुवारी (दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन परप्रांतीय कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृतांमध्ये बिहार राज्यातील नरेंद्रकुमार यादव (वय 25), ओडिशा राज्यातील हेमंत पहाडी (वय 26) आणि विनेशकुमार (वय 27) यांचा समावेश आहे. हे तिघेही तळसंदे येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये प्लंबिंगचे काम करत होते.