केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडचा जामीन अर्ज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयाने फेटाळला आहे. कराडवर गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याला कोणतीही सवलत नाकारली. दरम्यान, याच प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जावरचा निकाल राखून ठेवण्यात आला असून तो लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.