मलकापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचा ठपका ठेवत संबंधित मंडळाच्या पाच ते सहा जणांच्या विरोधात कराड शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काही साहित्य ही जप्त करण्यात आले आहे. वास्तविक संबंधित मंडळांने या शाही आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात यापूर्वीच लेखी स्वरुपात माहिती दिली होती.