मेडीकल कॉलेज सुरु झाल्यापासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत आहे. मागील चार वर्षात उपचारासाठी येणार्या रुग्णांच्या सेवेत मोठी वाढ झाली असून, रुग्णालयातही अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. डॉक्टरांची संख्याही वाढली आहे. भविष्यात एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांसाठी पोस्ट ग्रॅज्युएटही याच ठिकाणी करताव यावे म्हणून सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.