बैल पोळा, हरतालिका, गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी दिग्रस पोलीस स्टेशनतर्फे दिग्रस शहरातील अंश मंगल कार्यालयात शांतता सभेचे आयोजन आज दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान करण्यात आले. या सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, प्रशासकीय अधिकारी, नगरपरिषद व महावितरणचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे 200 हून अधिक नागरिक उपस्थित होते.