भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी, असिफ बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या, हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.