आयशर व दुचाकीच्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना पाचोरा जळगाव हायवे वरील हडसन गावाजवळ आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली आहे, पाचोरा तालुक्यातील हडसण गावाजवळील बस स्टँड जवळ आयशर व प्लेटिना या दुचाकी वाहनांची जोरदार धडक झाल्याने यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला त्यात तो गंभीर जखमी झाला, स्थानिक कार्यकर्त्यांनी घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांना देताच त्यांनी घटनेस्थळी धाव घेतली,