कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 63 वी सर्वसाधारण सभा याही वर्षी आज प्रचंड गोंधळातच पार पडली. महायुतीचे म्हणून चेअरमन पदावर असलेल्या नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत भाजपच्या संचालिका शौमिका महाडिक यांना विरोधक म्हणूनच वागणूक देऊन विषय पत्रिकेच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यास मज्जाव केला.