बाळापूर शहरातील गाजीपूर वस्तीतील काही गोरगरीब नागरिकांच्या जागेवर घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी जागा नियमाकुल करून देण्यात आल्या मात्र त्यांच्या कर पावतीवर सतरंजीपुरा व इस्लामपूरा असं वस्तीचे नाव बदलल्यामुळे गाजीपूर वासियांवर घरकुल लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.त्यामुळे कर पावतीवरील वस्तीचे नावात दुरुस्ती करण्यात यावे यासाठी गाजीपूर येथील नागरिकांनी मुख्याधिकारी न.प.बाळापूर यांना बुधवार दि.३० जुलै रोजी दुपारी निवेदन दिले व दुरुस्ती न झाल्यास दि.१५ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला.