प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सन २०२४-२५ हंगामातील १२७ कोटी ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा या निर्णयामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील ८९,६२९ हजार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते व परिस्थिती समजावून सांगितली होती. व विधान भवनात सुद्धा आवाज उठवला होता.