उल्हासनगर क्रमांक तीन येथील संतोष नगर मध्ये एक साप नागरिकांच्या घरात शिरला आणि तो सैरावैरा धावू लागला. याची माहिती तातडीने सर्पमित्रांना दिल्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सापाला रेस्क्यू केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अंधाराच्या वेळी अचानक परिसरामध्ये साप शिरल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.