कामोठे येथील जुई गावात 6 वर्षांपूर्वी एकाने आपल्या पत्नीला रॉकेलमध्ये पेटवले होते. पाच दिवसांनी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्यापासून कामोठे पोलीस संशयीत पतीचा शोध घेत होते. मात्र पोलिसांच्या विविध पथकाने शोध घेऊनही माथेफीरू पती सापडत नव्हता. अखेर कामोठे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर पत्नीचा खून करून फरार असलेल्या आरोपी पतीला हैद्राबाद येथून अटक केली. जुई गावातील एका भाड्याच्या घरात मनोहर सरोदे आणि त्याची पत्नी आणि मुले असे कुटूंबिय राहत होते.