इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात एका एअरजेट कारखान्यात कामगारांच्या वादातून संतोष पांडा (वय अंदाजे ४०, रा. विनायक हायस्कूलजवळ, शहापूर) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजता घडली असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता शहापूर पोलिसातून मिळाली.या घटनेने औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत खळबळ उडाली आहे.बालासा उद्योग या कारखान्यात पांडा यांच्यासोबत तापसो बेहरा,शिवा बेहरा आणि मनोज बेहरा हे तिघे काम करत होते.