शहरातील करवंद नाका परिसरातील लक्ष्मीनारायण नगरमध्ये 8 ऑगस्ट रोजी भरदिवसा घरफोडीची घडली आहे.शहरात दिवसा घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संशयीतांनी 65 हजार रोख, 1800 रुपयांचा चांदीचा पुजेचा ग्लास,फुलपात्र,दिवा,वाटी, तांब्या,कुंकूवाटी व 2100 रुपयांची लक्ष्मी देवीची नाणी व शिक्के असा एकूण 68,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास डीबी पथकाचे प्रमुख पोहेकॉ राजेंद्र रोकडे करीत आहे.