यावल शहरातील पाचव्या दिवसाच्या बाप्पाचे रविवारी विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून शुक्रवारी रूट मार्च करण्यात आला. संवेदनशील मार्गाची पोलीस पथकांनी पाहणी केली. या रूट मार्चमध्ये दंगल नियंत्रण पथक, शीघ्रकृतिदल,स्थानिक पोलीस व होमगार्ड यांचा सहभाग होता