लातूर-थोर महापुरुषांच्या त्याग आणि समर्पणावरच, आपला देश आणि येथील संपूर्ण मानवी समाज, आज येथे समर्थपणे उभा आहे असे प्रतिपादन, प्रसिद्ध लेखक प्रा. रामकिशन समुखराव यांनी केले. ३१ ऑगस्ट रोजी जयभारत प्रभाती मित्र परिवाराच्यावतीने, साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद चौक लातूर येथे आज सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आलेल्या, भाषणामध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दलित मित्र श्री सुरेशराव चव्हाण हे होते.