मालेगावात नील गाईच्या मांसची बेकायदा विक्री, 35 किलो मांस जप्त,एकाला अटक, दोन जण फरार... Anc:- वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या मालेगावातील बेलबाग परिसरात धडक कारवाई करीत. बेकायदेशीरपणे नील गाईचे मांस विक्री करणाऱ्या मसूद अहमद अब्दुल मजीद यास शिताफीने अटक केली. त्याच्याकडून नील गाईचे दोन मुंडके, चार पाय तसेच 35 किलो 500 ग्रॅम मांस व चाकू, दोन सुरे, टोचा, लोखंडी वजनकाटा जप्त केला.तर मुदस्सीर अहमद व परवेज अहमद हे दोघे जण फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.