लातूर : रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल व मातोश्री गणेश मंडळ, मेघराज नगर लातूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत रेबीज लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात कुत्रे तसेच मांजरीचे लसीकरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या वतीने शहरी तसेच ग्रामीण भागातील कुत्रे - मांजरींसाठी सातत्याने मोफत रेबीज लसीकरण शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे.