तारदाळ येथे आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता बी.पी.एड कॉलेज समोरील वळणावर एक भीषण अपघात घडला.भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने (क्र. MH-51-C-0079) समोरून येणाऱ्या टाटा सुमो (क्र. MH09-CM-3365) वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात टाटा सुमोमधील सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून,त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.