शहरातील तब्बल 4 हजार जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या तपासात बनवाबनवी सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी SIT नेमण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमैया हे गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता रामदासपेठ पोलिस स्टेशनला भेट देणार आहेत. आधारकार्डवरील जन्मतारीख व प्रमाणपत्रातील तारीख वेगळी असलेल्या 100 लोकांची यादीही यावेळी ते सादर करतील, अशी माहिती जिल्हा भाजप प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दिली.