अनसिंग येथील जिजामाता विद्यालयाने पर्यावरण रक्षणासाठी पाटी-लेखनाला पुन्हा स्थान देत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गणित शिक्षक ललित भुरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने इयत्ता दहावीतील ८० विद्यार्थ्यांना पाटी व लेखनी वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गणितासह इतर विषयांतील सराव अधिक सुलभ झाला आहे. पाटीवर सराव करताना चुकलेल्या उदाहरणांची तात्काळ दुरुस्ती करता येते आणि पुन्हा पुन्हा सराव करता येतो. त्यामुळे ‘रफ’ वहीची गरजच उरत नाही.