काटोल व नरखेड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या तसेच घराचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आपत्तीग्रस्त भागाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आज आमदार चरण सिंग ठाकूर यांनी उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांच्यासोबत केला. यावेळी महसूल व कृषी विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळेल अशी ग्वाही दिली.