चोपडा तालुक्यात धुपे खुर्द हे गाव आहे.या गावात पोलिसात तक्रार देण्याच्या कारणावरून वाद झाला. आणि या वादातून विजय ढिवरे वय ५० यांना सुदाम बाविस्कर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.