आज ३१ ऑगस्ट रविवार रोजी दुपारी साडे चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील राजापेठ येथील भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय येथे विराजित लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात शहरातील भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते यांनी भेट दिली व मनोभावे श्रीचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, कार्यकर्ते यांच्यासोबत दिलखुलास संवाद साधला