धक्कादायक घटनेने बीड हादरले आहे. शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली असून नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केला आहे. अश्विनी येडे असं या महिलेचे नाव आहे. आरोपींच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेली पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.