225 वर्षाची परंपरा असलेल्या मयुरेश्वराचे मोठ्या थाटात विसर्जन केले. सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती तिर्थक्षेत्र असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात "एक गाव - एक गणपती" ची २२५ वर्षांपासून परंपरा आहे. सरकार वाड्यात प्रतिष्ठापित मयुरेश्वर गणेशाची आज मुख्य आरती केल्यानंतर छत्री, चौरी, अब्दगिरी, चामर, ध्वज, दंड अशा राजेशाही थाटात सरकार वाड्यातुन मयुरेश्वराची पालखीतुन विसर्जन मिरवणूक सुरू झाली.