पनवेल मध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे खड्ड्यांच्या विरोधात आज मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वेगवेगळ्या आशयाचे फलक हातात घेऊन खड्डे सफारी करण्यात आली. मात्र या आंदोलनामध्ये यमराजच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधले. कारण रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत आणि अनेकांना नाहक जीव गमावावा लागतो त्यामुळे यमराज सहभागी झाल्याचे आंदोलक म्हणाले