डाबकी रोडवरील सर्व कृत्रिम गणेश विसर्जन घाटांवर नागरिकांनी यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश मूर्तींचे विसर्जन केले. या घाटांवर जमा झालेल्या मूर्तींचा उठाव करण्यासाठी अकोला महापालिका प्रशासनाने विशेष पथक नियुक्त केले होते. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने या विसर्जित मूर्ती गोळा केल्या. त्यानंतर या मूर्ती मन नदीकाठी नेऊन विधीवत विसर्जन करण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील विसर्जन घाटांवरील स्वच्छता राखली गेली असून पर्यावरण संरक्षणाबरोबरच