छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर व पोलीस स्टेशन तुमसर यांच्या संयुक्त आयोजनातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा 2025 चे आयोजन गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या कालावधीत करण्यात आले आहे. तुमसर शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यात सहभागी असणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 7 हजार रुपये द्वितीय 5 हजार रुपये व तृतीय 3 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेची सुरुवात आज दिनांक 27 ऑगस्ट पासून विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांच्या आगमनाने सुरू करण्यात आली.