आज दिनांक 27 ऑगस्टला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकात एका किराणा दुकानातुन वृद्ध महिलेची पिशवी फाडून दोन हजार रुपयाचे बंडल लंपास केल्याची घटना दिनांक 26 ऑगस्टला एक ते दीड वाजताचे दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबतीत बनाबाई त्रिंबक हटकर या साठ वर्षीय वृद्ध महिलेने मोर्शी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे