आज दि.31 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी सायंकाळी6वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील बदनापूर ते जालना या मुख्य मार्गावरील शहरापासून जवळच असलेल्या निरंकारी पेट्रोल पंपाजवळ धावत्या ट्रॅव्हल्स बस मध्ये 50वर्षे व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली,घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत ट्रॅव्हल्स ग्रामीण रुग्णालयात नेली व्यक्तीची ओळख पटली असून,नाव सुनील सज्जनराव टाले असे आहे, पोलीस पुढील तपास करत आहे.