नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील गाडेगाव या गावाजळील आसना नदिवर १) योगेश गोविंदराव उबाळे वय १७ वर्षे आणि २) बालाजी कैलास उबाळे वय १८ वर्षे दोघेही राहणार गाडेगाव हे दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आसना नदिचे पाण्यात बुडाले होते त्यापैकी आजरोजी योगेश गोविंदराव उबाळे वय १७ वर्षे या युवकाची बाॅडी त्रिकुट या गावाजवळ हल्याची वाडी गावातील नदीकिनारी मिळुन आली असून सदर बाॅडी दवाखान्यात नेण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत अशी माहिती आज दुपारी प्राप्त झाली आहे